Pune Murder News : जामिनावर बाहेर सुटलेल्या गुंडाचा पुण्याजवळ गोळ्या घालून खून

एमपीसी न्यूज : जामिनावर बाहेर सुटलेल्या एका गुन्हेगाराचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला. पुरंदर तालुक्यातील नीरा गावातील बस स्थानक परिसरात सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला.  पुणे जिल्ह्यात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. गणेश रासकर (वय 35) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. पुरंदर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या प्रकरणी अधिक माहिती, गणेश रासकर हा जेजुरी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. जून महिन्यात तो कारागृहातून जामिनावर बाहेर. आज सायंकाळच्या सुमारास तो नीरा स्टेशन जवळील मस्जिद परिसरात आला असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. अचानक झालेल्या या गोळीबारात गणेश रासकर हा जागीच ठार झाला.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. जेजुरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. पूर्ववैमनस्यातून खून झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.