Chakan News: भंडारा डोंगराच्या पायथ्याला लॉजमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील येलवाडी गावच्या हद्दीत चाकण-तळेगाव रोडवर भंडारा डोंगराच्या पायथ्याला असलेल्या एका लॉजवर सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा चाकण पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 5) दुपारी एक वाजता करण्यात आली.

गुलाब विठ्ठल जाधव (वय 38, रा. कोटोरेवाडी, पोस्ट. इंदुरी, ता. मावळ), रिदू ख्रिस्टराज फ्रान्सिस (वय 21, रा. कोहिनुर लॉज, येलवाडी, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण-तळेगाव रोडवर भंडारा डोंगराच्या पायथ्याला कोहिनुर लॉज आहे. या लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही बाब पडताळण्यासाठी पोलिसांनी एका बनावट गि-हाईकाला लॉजवर पाठवले.

आरोपींनी बनावट गि-हाईकाकडून दोन हजार रुपये घेऊन त्यांना लॉजच्या एका खोलीत शरीर सुखासाठी मुलगी उपलब्ध करून दिली. घटनेची पडताळणी होताच पोलिसांनी छापा मारून लॉज चालवणा-या दोन्ही आरोपींना अटक केली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) दशरथ वाघमोडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.