MPC News Achievement: एमपीसी न्यूजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, सर्व वाचकांचे आभार

एमपीसी न्यूज फेसबुक पेजने ओलांडला एक लाख लाईक्सचा (सबस्क्रायबर्सचा) टप्पा

0

एमपीसी  न्यूज – लाखो वाचकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणाऱ्या एमपीसी न्यूज या पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील पहिल्या सिटी न्यूज पोर्टलने मागील बारा वर्षांपासून ऑनलाइन बातमीच्या क्षेत्रातही आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. एमपीसी न्यूज सोशल मीडियावर दाखल झाल्यापासून असंख्य वाचकांनी दर्शक बनून ‘एमपीसी  न्यूज’ या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या पोर्टलला आपली पसंती दिली. या प्रेमामुळेच एमपीसी न्यूजच्या फेसबुक पेजने एक लाख लाईक्सचा (सबस्क्रायबर्सचा) टप्पा ओलांडला आहे आणि पुढील काळात मिलियन सबस्क्रायबर्स आणि त्यापुढीलही टप्पे नक्कीच पार करू, असा विश्वास आहे.   

क्षणाक्षणाचे प्रत्येक अपडेट नेटीझन्सना फेसबुकवर मिळत असल्यानेच, एमपीसी न्यूजचे फेसबुक पेज पुणे, आणि पिंपरी चिंचवड मध्ये नंबर वन बनलं आहे. बातम्यां व्यतिरिक्त विविध फोटो, व्हिडीओ यांनाही प्रेक्षकांची पसंती आहे.

फेसबुकवर महिन्याला जवळपास 75 लाख इतका रीच आहे. म्हणजेच जवळपास  75 लाखांपेक्षा जास्त फेसबुक युझर्स पर्यंत एमपीसी न्यूजच्या पोस्ट पोहोचतात. तर पोस्ट एन्गेजमेंट जवळपास 18 लाखांच्या घरात आहे.

याशिवाय एमपीसी न्यूजच्या पेजवरील फेसबुक व्हिडीओला तब्बल 10 लाख घरात व्ह्यूज मिळतात. एमपीसी न्यूज वेबसाईटला लाखो लोक भेट देतात. त्यामुळेच आमच्या वेबसाईट महिन्याला 60 लाख पेजव्ह्यूव्जचा टप्पा पार करते.

एमपीसी न्यूजचे संपादक विवेक इनामदार यांनी या यशाबद्दल सोशल मीडिया टीम, टेक्निकल सपोर्ट आणि संपादकीय टीमचे अभिनंदन केले आहे. हे सांघिक यश आहे, असे ते म्हणाले.

पिंपरी चिंचवड येथून सुरूवात केली असून त्याचा विस्तार आम्ही पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातही केला आहे व लवकरच सबंध महाराष्ट्रात हा विस्तार करण्यात येणार आहे.

एमपीसी न्यूजचे सर्व व्हिडीओज यूट्यूबप्रमाणे फेसबुकवरही पाहू शकता. एमपीसी न्यूजवर प्रेम करणाऱ्या लाखो दर्शकांमुळेच हे शक्य झाले असून यातूनच पुढील टप्पे यशस्वीपणे पूर्ण करू असा विश्वास आहे.

एमपीसी न्यूजचे युट्यूब चॅनेल तसेच MPC NEWS हे  फेसबुक पेज लाईक करा, सबस्क्राईब करा तसेच ट्विटर, इन्स्टाग्रामवर एमपीसी न्यूज ला फॉलो करायला विसरू नका.

एमपीसी न्यूज वाचकांचे सदैव ऋणी राहील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.