Bhosari News : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणा दिल्याने आणखी एक गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  हस्ते पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा रविवारी (दि. 6) आयोजित करण्यात आला. यावेळी अण्णासाहेब पाटील स्मारक, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फडणवीस यांना काळे झेंडे दाखवत आंदोलन केले.

याप्रकरणी चिखली आणि पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर भोसरी पोलीस ठाण्यात देखील अशाच प्रकारचा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पै. मारुतराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राचे उद्घाटन करण्यासाठी आलेल्या देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवत फडणवीस गो बॅक अशा घोषणा दिल्या प्रकरणी तीस ते पस्तीस जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष लांडगे, सौरभ लांडगे, मारुती लांडगे, प्रशांत पवार, संजय उदवंत, राजेंद्र हरिश्‍चंद्र बिराजदार, नाना लांडगे, रणू बिराजदार, डंगू शिंदे, परशुराम पवार, अमर बिराजदार, अमित गुप्ता, शेखर गव्हाणे, चिम्या लांडगे (सर्व रा. धावडे वस्ती, भोसरी) आणि इतर पंधरा ते वीस जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. या प्रकरणी पोलीस शिपाई सुरेश वाघमोडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

एमपीसी न्यूज पॉडकास्ट 10 मार्च 2022 – ऐकूयात पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरासह राज्यातील ठळक घडामोडींचा धावता आढावा. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील पै. मारुतराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. फडणवीस उद्घाटनासाठी कार्यक्रम स्थळी आले असता आरोपींनी काळे झेंडे आणि परत घेऊन फडणवीस गो बॅक, भ्रष्टाचारी पिंपरी-चिंचवड भाजपा अशा प्रकारचे फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली. आरोपींनी घोषणा देत शांततेचा भंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काऊंटडाऊन दहावी! भाग 9 – दहावीत टक्केवारी वाढविण्यासाठी संस्कृतचा अभ्यास महत्त्वाचा – सुवर्णा बोरकर. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.