Pimpri News : भाडे मागण्याच्या कारणावरून महिलेस मारहाण; तीन महिलांसह चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दुकानाचे भाडे मागण्याच्या कारणावरून दुकानात जबरदस्तीने येऊन चौघांनी एका महिलेला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 29) अजमेरा पिंपरी येथील रेणुका रॉयल सोसायटी येथे घडली.

याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुक्ता आनंद उनवणे (वय 37, रा. पिंपरी), जया (वय 36), विष्णू साहेबराव उनवणे (वय 42, रा. चिखली), मनीषा पवार (वय 35, रा. पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शॉपमध्ये आरोपी भाडे मागण्याच्या कारणावरून जबरदस्तीने आले. आरोपी जया हिने फिर्यादी यांचे दोन्ही हात पकडले. मुक्ता हिने फिर्यादी यांचे केस पकडून हाताने मारहाण करून त्यांच्या हाताच्या बोटाला चावा घेऊन जखमी केले. तसेच ऑफिसमधील खुर्ची फेकून तोडफोड केली. ओर्पी मनीषा हिने शिवीगाळ केली. मुक्ता हिने अन्य आरोपींना फिर्यादीस मारहाण करण्यासाठी चिथावणी दिली. फिर्यादी यांच्या मुलाला शिवीगाळ व दमदाटी केली. मुलाच्या हातावर लोखंडी हातोडीने मारून त्याला जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.