Pimpri News: भाजपातर्फे ‘अटल पुरस्कार’ अन् सन्मान सोहळा; शहर भाजपच्या माजी अध्यक्षांचा सत्कार

एमपीसी न्यूज – भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न  अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती व सुशासन दिना निमित्त नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांच्या वतीने ‘अटल पुरस्कार व सत्कार सन्मान सोहळ्याचे चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदीरा शेजारील देऊळमळा पटांगणाचे आयोजन करण्यात आले होते.  

भाजपा स्थापनेपासूनचे पिंपरी-चिंचवड शहराचे सर्व माजी अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. पक्षाचे प्रथम अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण नाईक, डॉ. प्रतिभाताई लोखंडे, मामंचंदजी अग्रवाल, दादाराम ढवाण यांना महापौर उषा ढोरे व पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री रवी अनासपुरे यांच्या हस्ते ‘अटल कार्यकर्ता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आणीबाणी व मिसा मध्ये अटक झालेले कार्यकर्ते आणीबाणी सुधीर केसकर, बाळासाहेब मोकाशी, सतीश बोरकर, मोहन गुपचूप, कांता जाधव यांसह स्व.गणेश देव, स्व.निवृत्तीभाऊ राऊत, स्व.रमण मुणगेकर, स्व.शरदराव नाटेकर, स्व.मधुकरराव जोशी, स्व. गोपाळ ताम्हणकर यांचा मरणोत्तर त्यांच्या कुटुंबीयांना व चिंचवडमध्ये  ज्यांनी भारतीय जनता पार्टीचे विचार रुजवले व पक्षाचा विस्तार केला असे जेष्ठ भाजपा निष्ठावंत कार्यकर्ते मधू जोशी, पै.ज्ञानेश्वर शेडगे, विमलताई जोशी, सुरेश गदिया, दिपक कुलकर्णी, विजय संपगावकर, गतीराम भोईर, कांताताई मोंढे, ॲड. सुभाष चिंचवडे, रविंद्र देशपांडे, उदय कवी, रविंद्र प्रभुणे, मिलींद भुर्के, सतीश वीपट, वसंतराव गुजर,  नंदू भोगले, मिलींद कुलकर्णी यांना भाजपा शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते  ‘अटल कार्यकर्ता पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.

आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना कालखंडात खऱ्या अर्थाने समाजसेवा करणाऱ्या विश्व हिंदू परीषद, बजरंग दल, श्री काळभैरवनाथ उत्सव समिती, नव तरुण मंडळ, चिंचवडचा राज श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ, पागेची तालीम मित्र मंडळ, श्री काळभैरवनाथ मित्र मंडळ, अखिल चिंचवड मंडई मित्र मंडळ, क्रांतीवीर भगतसिंग मित्र मंडळ, श्री लक्ष्मी विनायक प्रतिष्ठान, प्रयास ग्रुप महिलांचं खुलं व्यासपीठ, रौद्र शंभो युवा प्रतिष्ठान, ग्राम रक्षक दल चिंचवड पोलीस स्टेशन या संस्थांना आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते ‘अटल सेवा पुरस्काराने’ गौरविण्यात आले.

चिंचवडच्या जडणघडणीत मोलाचा वाचा असणाऱ्या जेष्ठ नागरिकांचा आमदार महेश लांडगे, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, शहर सरचिटणीस राजू दुर्गे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यावेळी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांच्या वतीने मोफत जेष्ठ नागरिक दाखला, आयुष्यमान भारत योजना व ई-श्रम कार्ड योजनेच्या शुभारंभाची घोषणा करण्यात आली.

याप्रसंगी बोलताना महेश लांडगे यांनी अतीशय प्रतिकुल परिस्थित पक्षाचे नेतृत्व करणारे सर्व माजी अध्यक्ष, आणीबाणी अटक झालेले सर्व कार्यकर्ते व जेष्ठ कार्यकर्ते यांनी पक्षाला सातत्याने मार्गदर्शन करत रहावे असे आवाहन करत सर्वांचे आभार मानले आणि पक्ष म्हणून आम्ही सर्वजण नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहू असे सांगत अटलजींच्या जयंतीच्या निमित्त एक अतीशय सुंदर भावनिक कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.