Chikhali News : सोनवणे वस्ती येथील पुठ्ठ्याच्या कंपनीला आग

एमपीसी न्यूज – सोनवणे वस्ती, चिखली येथील पुठ्ठ्याच्या कंपनीला आग मोठी आग लागली आहे. आज (दि.11) दुपारी ही आगीची घटना घडली. आगीचे प्रचंड लोळ हवेत पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या पाच बंब घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा काम सुरू आहे.

याबाबत मिळालेली अधिकची माहिती अशी की, सोनवणे वस्ती येथे असलेल्या पुठ्ठ्याच्या कंपनीला दुपारी भीषण आग लागली. आगीची वर्दी कळताच अग्निशमन दलाच्या पाच बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जवान शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

आठवड्याच्या आत तिसरी आगीची घटना

पिंपरी चिंचवड शहरात एका आठवड्याच्या कालावधीत ही तिसरी आगीची घटना आहे. बुधवारी (दि.06) मोशीतील कचरा डेपोला मोठी आग लागली. त्यानंतर त्याच्या दुस-याच दिवशी म्हणजे (गुरूवारी (दि.07) मोशीतीलच एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली. आणि आज सोमवारी (दि.11) एका पुठ्याच्या कंपनीला आग लागल्याचे समोर आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.