Chakan Crime : चाकूने हल्ला करून गंभीर जखमी करणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज : चाकूने हल्ला करून गंभीर जखमी (Chakan Crime) करणाऱ्यास अटक करण्यात आले आहे. याबाबत पीडित दीपक बांदल (वय 21 वर्षे, रा. भांबोली, तालुका खेड, जिल्हा पुणे; मुळगाव अल्हनवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर) यांनी चाकण (महाळुंगे चौकी) येथे फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी योगेश घुले (वय 25 वर्षे, रा. बालाजी नगर मेदनकरवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे; मूळ रा. भांडेगाव, तालुका खुलताबाद जिल्हा औरंगाबाद) या आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात चाकण (महाळुंगे चौकी) भा.द.वि कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jayashree Kale : कन्येच्या भाव अन्‌‍ अर्थपूर्ण सादरीकरणातून घडले ‘विंदा दर्शन’

फिर्यादी भांबोली गावातील हॉटेल रुद्रा चायनीजचे (Chakan Crime) समोर रोडवर काल 22 ऑगस्टला रात्री 8 वाजेच्या सुमारास आला व म्हणाला तू माझ्या प्रेयसीवर प्रेम करू नको, तिचा नाद सोडून दे, ती माझी प्रेयसी आहे. त्यानंतर आरोपीने त्याच्या हातातील चाकूने फिर्यादीच्या हातावर व डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ वार केले. तसेच, फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकूने पोटावर वार करून गंभीर जखमी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.