Bhosari Crime News : वर्गमित्राने लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार, आरोपी अटकेत 

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून वर्गमित्राने महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपीला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. नोव्हेंबर 2018 ते 14 मे 2021 या दरम्यान हा प्रकार घडला. 

राजकुमार सिद्धप्पा नागराळी (वय 25, रा. महात्मा फुलेनगर, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडित महिलेनं आज (रविवारी, दि.23) भोसरी एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी हा फिर्यादी महिलेचा वर्गमित्र आहे. फिर्यादी महिलेचा  वाढदिवस होता त्या दिवशी आरोपी महिलेला घेऊन तो हॉटेलवर गेला व तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. तसेच, लग्नाबद्दल विचारलं असता फिर्याद महिलेला आरोपीने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.