Dapodi News : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अन्नधान्य वाटप

एमपीसी न्यूज – हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त पिंपरी युवासेनेच्या वतीने  दापोडीतील सरस्वती अनाथ आश्रमाला अन्नधान्य देण्यात आले.

युवती सेनेच्या मनाली कुटे, अविनाश जाधव, रोहित गोरे, सुरज शिंगोटे यावेळी उपस्थित होते.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितासाठी नेहमीच रोखठोक भूमिका घेतली. मराठी माणसाला ताठ मानेने जगायची शिकवण त्यांनी दिली. निर्भीड वक्ते, उत्कृष्ट व्यंगचित्रकार, बहुआयामी व्यक्तीमत्व अशी त्यांची अष्टपैलु प्रतिमा लाखो-करोडो लोकांच्या मनावर सदैव राज्य करत राहील असे पिंपरी युवासेना युवा अधिकारी निलेश हाके म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.