Chikhali News : चालकाची करामत, शेती साहित्य व पिकअपचा 9.66 लाख रुपयांचा अपहार 

एमपीसी न्यूज – चालकाने पिक अपमध्ये असलेल्या शेती साहित्यासह पिकअपचा 9.66 लाख रुपयांचा अपहार केला आहे. 10 ते 20 जानेवारी 2022 या कालावधीत जाधववाडी, चिखली येथे हा प्रकार घडला. 

या प्रकरणी पिकअप मालक मारुती उमाजी टाकळकर (वय 38, रा. जुन्नर, पुणे) यांनी शुक्रवारी (दि.21) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिकअप चालक गणेश मनोहर घुंगरड (वय 37,रा. जुन्नर, पुणे मुळगाव बीड ) याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 406, 407 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश हा फिर्यादी यांच्या पिकअपवर (एम एच 14 एच जी 4623) चालक म्हणून काम करतो. जाधववाडी, चिखली येथून पिक अप मध्ये 2.66 लाख रुपयांच्या शेतीसाठी आवश्यक फिनोलेक्स पाईप व रिंग भरण्यात आल्या होत्या. हे साहित्य हैदराबाद येथे पोहोचवायचे होते. दरम्यान, आरोपीने साहित्यासह व पिकअपचा 9.66 लाख रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.