Hinjawadi Crime News : भाडेकरू महिलेच्या घराचा दरवाजा वाजवल्याचा जाब विचारल्याने चौघांना मारहाण; तिघांना अटक

एमपीसी न्यूज – भाडेकरू महिलेच्या घराचा दरवाजा काही मुलांनी वाजवला. त्याचा जाब घरमालकाने विचारला असता दरवाजा वाजवणा-या सहा जणांनी घर मालक, त्यांचा मुलगा, भाडेकरू मुलगा आणि घरमालकाच्या भावाला मारहाण केली. पोलिसांनी यातील तिघांना अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि. 25) दुपारी साडेतीन वाजता मारणे वस्ती, माण येथे घडली.

मोहम्मद समसाद ताहीरहुसेन (वय 41), मोहम्मद बबलू मोहम्मद असाबोल (वय 24), सहावाज आलम ताहीद (वय 20, रा. माणगाव, ता. मुळशी) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह त्यांच्या आणखी तीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पंढरीनाथ विठ्ठल मारणे (वय 50, रा. मारणे वस्ती, माण, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ बाळू मारणे यांच्या मालकीच्या खोलीत एक महिला आणि त्यांचे कुटुंब राहते. त्यांच्या घराचा दरवाजा बुधवारी दुपारी आरोपींनी वाजवला. त्याचा जाब बाळू मारणे यांनी आरोपींना विचारला. त्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांचा भाऊ बाळू मारणे, त्यांचा मुलगा समीर, भाडेकरूचा मुलगा रोहित यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यातील एकाने फिर्यादी यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.