Thergaon News : कार्यक्रम पत्रिका दिली नाही म्हणून गोंधळाच्या कार्यक्रमात ‘गोंधळ’, महिलेचा विनयभंग 

एमपीसी न्यूज – कार्यक्रम पत्रिका दिली नाही म्हणून गोंधळाच्या जागरण कार्यक्रमात येत दोघांनी ‘गोंधळ’ घालत महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. थेरगाव येथे गुरुवारी (दि.18) रात्री साडे अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. 

याप्रकरणी पिडित 37 वर्षीय महिलेनं शुक्रवारी (दि.19) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल गोपाळ शिंदे (वय 30) आणि आकाश गोपाळ शिंदे (वय 28, दोघेही रा. थेरगाव फाटा, थेरगाव) यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 354, 504, 34 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल याने गोंधळाच्या जागरण कार्यक्रमात येत कार्यक्रम पत्रिका दिली नाही म्हणून शिवीगाळ केली तसेच, फिर्यादी यांच्या खूर्चीला लाथ घालून त्यांचा विनयभंग केला. तसेच आरोपी आकाश हा केवळ अंडरवेअर वरती कार्यक्रमात आला होता व त्यांने उपस्थित लोकांना शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.