Pune News : गतवर्षी पुण्यात खुनाच्या 100 घटना, यातील किती उघडकीस आल्या? वाचा इथे

एमपीसी न्यूज : पुणे शहरात गेल्या वर्षी खुनाच्या तब्बल 100 घटना घडल्या. यातील 96 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. परंतु चार खुनाच्या गुन्ह्याचा मात्र अजूनही तपास लागलेला नाही. 2020 मध्ये शहरात खुनाच्या 77 घटना घडल्या होत्या. त्यामानाने 2021 वर्षात खुनाच्या घटनात वाढ झाल्याचे दिसून येते. 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी मोक्का कारवाईचा वापर केला. या माध्यमातून त्यांनी 60 हुन अधिक गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई केली. तर एमपीडीए नुसार अनेक सराईत गुन्हेगारांना तुरुंगात धाडले आहे. परंतु असं असलं तरीही पुणे शहरात गेल्या वर्षी कुणाच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येते. यामध्ये कौटुंबिक वाद, पूर्ववैमनस्यातून आणि किरकोळ वादातून सर्वाधिक खून झाले आहे.

2019 मध्ये पुणे शहरात खुनाचा 74 घटना घडल्या होत्या. त्यातील 70 गुन्हे उघडकीस आले होते. तर 2020 मध्ये खुनाच्या 77 घटना घडल्या होत्या. विशेष म्हणजे लॉकडाऊन असतानाही हे खून झाले होते. यातील 71 गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले होते. तर 2021 मध्ये तब्बल शंभर खुनाचे प्रकार उघडकीस आले. त्यातील 96 घटना उघडकीस आले आहेत. तर चार खुनाच्या घटनेचे गूढ अजूनही उकलले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.