Pune News : पुणे स्टेशन परिसरात ‘या’ किरकोळ कारणावरून एकाची गळा चिरून निर्घृण हत्या

एमपीसी न्यूज : पुणे स्टेशन परिसरातील जुने जिल्हा परिषद कार्यालयासमोर एका व्यक्तीची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. मंगळवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. कोणताही पुरावा मागे नसताना पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपींना शोधून काढले. दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यामुळे आरोपींनी त्या व्यक्तीचा खून केला. 

याप्रकरणी प्रभातकुमार कमलाकर म्हस्के (वय ३६, नविन आरटीओ कार्यालयाजवळ, मुळ. सोलापूर) आणि निलेश बाळासाहेब भोसले (वय २५, मु.वेल्हे, शिवापूर) या दोघांना अटक केली आहे. तर संजय (पुर्ण नाव व पत्ता पोलीसांना मिळाला नाही) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत उपनिरीक्षक सुनिल रणदिवे यांनी तक्रार दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय हा फुटपाथवर राहतो. तो फिरस्ता असून, त्याला दारूचे व्यसन होते. मिळेल ते कामे तो करत असत. दरम्यान, आरोपी दोघेही बिगारी काम करतात. ते येथून येत जात असत. यावेळी संजय त्यांना सतत दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करत होता. पैसे न दिल्यास तो वाद देखील घालत असे, असे पोलीसांनी सांगितले आहे. मंगळवारी पहाटे त्याचा मृतदेह सापडला होता.

भल्या सकाळी खून झाल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. पोलीसांनी लागलीच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच खबऱ्यांची मदत घेऊन तपासाला सुरूवात केली. यावेळी या दोघांबाबत माहिती मिळाली. वरिष्ठ निरीक्षक विष्णू ताम्हाणे, सहाय्यक निरीक्षक संदीप जोरे, एच. बी. खोपडे, महिला उपनिरीक्षक एम. जे. त्र्यंबके व त्यांच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्यावेळी त्यांनी दारूसाठी तो सतत पैसे मागत होता. तसेच, पैसे न दिल्यास वादही घालत असल्याने खून केल्याचे सांगितले. अधिक तपास समर्थ पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.