India Corona Update: चोवीस तासांत 19,968 नवे कोरोना रुग्ण, 48,847 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – भारतातील कोरोना संसर्गाचा वेग मंदावला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 19 हजार 968 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 48 हजार 847 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट घटून 1.68 टक्के एवढा झाला आहे. 

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 4 कोटी 28 लाख 22 हजार 473 एवढी झाली आहे. त्यापैकी 4 कोटी 20 लाख 86 हजार 383 रूग्ण यशस्वी उपचारानंतर बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.28 टक्के एवढा झाला आहे.

देशात सध्याच्या घडीला 2 लाख 24 हजार 187 ॲक्टिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 673 कोरोना रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. आजवर 5 लाख 11 हजार 903 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा मृत्यूदर 1.19 टक्के एवढा झाला आहे.

 

ICMR च्या आकडेवारी नुसार आजवर 75.93 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 11.87 नमूने तपासण्यात आले आहेत. देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आजवर 175 कोटी 37 लाख 22 हजार 697 जणांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.