India Corona Update: देशातील 27.67 लाख रुग्णांपैकी 20.27 लाख झाले बरे

India Corona Update: Out of 27.67 lakh patients in the country, 20.27 lakh have recovered मागील 24 तासांत देशभरात 1,092 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून देशातील एकूण मृतांची संख्या 52 हजार 889 इतकी झाली आहे.

एमपीसी न्यूज – देशातील एकूण 27.67 लाख कोरोना रुग्णांपैकी तब्बल 20.27 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. असे असले तरी देशात दिवसेंदिवस नव्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसून येत आहे. मागील 24 तासांत देशभरात 64 हजार 531 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 27 लाख 67 हजार 264 एवढी झाली आहे. त्यापैकी सध्या 6 लाख 76 हजार 514 सक्रिय रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे देशातील तब्बल 20 लाख 27 हजार 871 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील 24 तासांत देशभरात 1,092 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून देशातील एकूण मृतांची संख्या 52 हजार 889 इतकी झाली आहे.

देशातील कोरोना चाचणीचे प्रमाण वाढले असून मंगळवारी (दि.19) रोजी देशात 8 लाख 01 हजार 518 चाचण्या घेण्यात आल्या. देशात आजवर तब्बल 3 कोटी 17 लाख 42 हजार 782 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.

आरोग्य मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगतिलं की, देशात संसर्गग्रस्तांची संख्या कमी होत आहे. देशात कोरोनाच्या पीक पॉईंटबद्दल काय परिस्थिती आहे, याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘आम्ही अधिक मॅथेमॅटिकल मॉडेलवर विश्वास करत नाही. आमच्यासाठी कोरोनाचा पीक पॉईंट असं काहीही नाही. भारत सरकारचं संपूर्ण लक्ष कंटेन्मेंट, अधिक टेस्टिंग आणि उत्तम इलाज यावरच आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.