Laxman Ranawade : तीन दशकात जगातील 10 देशांमध्ये पोहोचलेली मराठा सेवा संघ ही एकमेव संघटना – लक्ष्मण रानवडे

एमपीसी न्यूज : अकोला येथे 32 वर्षांपूर्वी मराठा सेवा संघ या नावाने लावलेल्या रोपट्याने तालुका, जिल्हा, देश आता जगातील 10 देशांमध्ये सांस्कृतिक संघटना म्हणून यश मिळविले असल्याचे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अधिवक्ता लक्ष्मण रानवडे (Laxman Ranawade) यांनी आज केले.

संत तुकाराम नगर येथील राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन येथे मराठा सेवा संघाच्या 32 व्या वर्धापनदिना निमित्त मराठा सेवा संघाच्या सर्व कक्षांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात रत्नप्रभा सातपुते यांच्या जिजाऊ वंदनाने झाली. मराठा सेवा सेवा संघाचे उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव व पुणे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष व मराठा मोर्चाचे समन्वयक राजेंद्र पुंजीर हे प्रमुख पाहुणे म्हणून या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्षा भारती भदाने यांनी डुंबरी समाजाच्या 86 वर्षाच्या शांता पवार या महिलेस जाहिर केलेले 10 हजाराचे बक्षीस जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्षा सुनीता शिंदे व प्रकाश जाधव यांच्या हस्ते देण्यात आले.

प्रकाश जाधव म्हणाले की, मराठा सेवा संघाने धार्मिक, जातीय विद्वेषातुन दगडे उचलणाऱ्या युवकांच्या हातात वैचारिक पुस्तके दिली. महाराष्ट्रातील जातीय सलोखा वाढविला. इतिहासाच्या पुनर्लेखनाची चळवळ उभा करुन इतिहासाचे विकृतीकरण रोखले. महापुरुषांचे विचार घराघरापर्यंत घेऊन जाणाऱ्या लेखक, वक्ते, शाहीर, कलाकारांची मोठी फळी निर्माण केली. लेखकांना वाचकवर्ग दिला. वक्त्यांना श्रोतावर्ग दिला. कलाकारांना प्रेक्षकवर्ग दिला. महाराष्ट्राला वैचारिकवर्ग दिला. धार्मिक गोष्टींचा विचार करताना धर्माचा उदात्त विचार सांगणारी “शिवधर्म गाथा” दिली. समाजातील सांस्कृतिक दहशतवाद संपविण्यासाठी समाजाला सांस्कृतिक वारसा आणि बुद्ध-तुकोबा-शिव-फुले-शाहू-आंबेडकर ही साखळी समजावुन सांगितली, असे प्रकाश जाधव म्हणाले.

संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे म्हणाले की, मराठा सेवा संघाचे कार्य प्रत्यक्षात जितके दिसून येते, तितकेच अप्रत्यक्ष महाराष्ट्रातील सर्व समाजघटकांवर मराठा सेवा संघाच्या चळवळीचा प्रभाव पडला आहे. आज माझ्यासारखे अनेक जण वेगवगेळ्या विषयांवर निर्भीडपणे व्यक्त होतात. त्यासाठी मराठा सेवा संघाचा खूप मोठा वैचारिक आधार राहिलेला आहे. पुरोगामी विचारांची नाळ बळकट करून विचारांनी एक असलेल्या साथीदारांना एकत्र आणण्याचे काम मराठा सेवा संघ करत आहे. त्यामुळे वैचारिक क्रांती होणार हे मात्र नक्की.

Ganpati Darshan Yatra : ज्येष्ठ नागरिकांची मोफत गणपती दर्शन यात्रा

पुरुषोत्तम खेडेकर यांनी स्थापना केलेल्या या संघटनेचे 36 कक्ष असून या मार्फत सामाजिक संघटन करत असताना शिवसेनेसारख्या राजकीय पक्षाबरोबर मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडने एकत्र काम सुरु असल्याची माहिती रानवडे यांनी यावेळी केली .

या कार्यक्रमात प्रकाश जाधव, राजेंद्र पुंजीर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक मनोज गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी कायद्याकक्षाचे अध्यक्ष वकील श्रीराम डफळ, संत गाडगे बाबा प्रबोधन कक्षाचे अध्यक्ष, शोभा जगताप, ज्येष्ठ नागरिक जिल्हा अध्यक्ष सुभाष देसाई आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाल्मिकी माने, प्रकाश बाबर, सुरेश इंगळे, माणिक शिंदे, जयसिंग सासवडे, विजय शिंदे यांनी काम केले. तर, कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे सचिव सचिन दाभाडे यांनी केले. सूत्रसंचालन संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण कदम यांनी केले, तर आभार जिजाऊ ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्षा सुनीता शिंदे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.