Chikhali News : चाकूने वार करत तरुणावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – एका तरुणावर चाकूने वार करत खुनी हल्ला करण्यात आला. ही घटना शुक्रवारी (दि. 24) दुपारी तीन वाजताच्या सुमारास जाधववाडी चिखली येथे घडली.

काशिनाथ पवार (रा. मुरूम, ता. उमरगा), 43 वर्षीय महिला आणि तिची 27 वर्षीय मुलगी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक एस टी मस्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी काशिनाथ हा फिर्यादी यांच्या 43 वर्षीय बहिणीचा मित्र आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या घरात आला. त्याने फिर्यादी यांच्या आईला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यामुळे फिर्यादी यांचा भाऊ अजय रामू राठोड हा भांडणे सोडवत होता.

त्यावेळी आरोपी ,43 वर्षीय बहिणीने आणि तिच्या मुलीने भाऊ अजय राठोड यांना धरून ठेवले. त्यानंतर आरोपी काशिनाथ याने ‘तू माझ्या आणि ललिताच्या सारखा मध्ये येतो. तुला लय माज आला आहे. तुला आता खल्लास करतो’, असे म्हणून चाकूने अजयवर वार केले. यामध्ये अजय गंभीर जखमी झाला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.