Hinjewadi News : दगडाने ठेचून तरुणाचा खून

एमपीसी न्यूज – दगडाने ठेचून तरुणाचा खून केल्याची घटना आज (शुक्रवारी, दि. 5) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास हिंजवडी परिसरात उघडकीस आली आहे.

खून झालेल्या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. ओळख पटविण्याचे काम हिंजवडी पोलिसांकडून सुरू आहे.

_MPC_DIR_MPU_II

मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सयाजी हॉटेल जवळ अज्ञातांनी एका तरुणाचा दगडाने ठेचून खून केला. हा प्रकार शुक्रवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आला. हिंजवडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

खून झालेला तरुण हा कामगार असण्याची शक्यता आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.