Chinchwad News : धारदार शस्त्राने वार करत तरुणाचा खून 

एमपीसी न्यूज – धारदार शस्त्राने वार करत तरुणाचा खून केल्याची घटना मंगळवारी (दि. 4) रात्री नऊच्या सुमारास वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली. 

अभी व्यंकट पवार (वय 25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी परिसरात एका निर्जन ठिकाणी एकजण जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती चिंचवड पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एक तरुण मृतावस्थेत पडला असल्याचे दिसले. पोलिसांनी मयत अभी पवार यांची ओळख पटवली.

मयत अभी पवार हा मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेल्याची माहिती समोर आली आहे. पार्टी करीत असताना मित्रांशी झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.