Chinchwad News: केएसबी चौकात अंमली पदार्थ मेफेड्रोन बाळगल्याप्रकरणी एकाला अटक‌

एमपीसी न्यूज – अंमली पदार्थ मेफेड्रोन जवळ बाळगल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी एकाला केली आहे. केएसबी चौक, चिंचवड येथे मंगळवारी (दि.19) ही कारवाई करण्यात आली. आरोपी कडून 3 ग्रॅम 560 मिली वजनाचा मेफेड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ आणि एक चार चाकी असा 6 लाख 10 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

पद्मसिंह हेमंत पाटील (वय 22, रा. सुसगाव, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध महादेव सावर्डे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने मेफेड्रोन हा अंमली पदार्थ जवळ बाळगला होता. पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक करत, त्याच्याकडून 3 ग्रॅम 560 मिली वजनाचा मेफेड्रोन (एमडी) आणि एक चार चाकी असा 6 लाख 10 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.