Pune News : शिवसेना ज्याला सांगेल त्याला आमचे मत – शरद पवार 

एमपीसी न्यूज : राज्यसभेच्या मागील निवडणुकीमध्ये शिवसनेने आम्हाला दुसरी जागा निवडून येण्यासाठी मदत केली होती. यावेळी पुढील निवडणुकीमध्ये दुसर्‍या जागेसाठी आम्ही शिवसेनेला मदत करू, असे ठरले होते. आगामी काळात होणार्‍या राज्यसभेच्या निवडणुकीत आमची एक जागा निवडून येणार आहे. त्यामुळे आमची शिल्लक मते ही शिवसेना सांगेल त्याला आम्ही देऊ, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले, देशातील मूलभूत प्रश्‍न सुटलेले नाही. महागाई प्रंचड प्रमाणात वाढली आहे. सामान्य माणसाला प्रपंच कसा चालवायचा असा प्रश्‍न पडला आहे. आता हे प्रश्‍न सोडवू शकत नसल्यामुळे जाणीवपूर्वक कायदा आणि सुव्यवस्थेचा  प्रश्‍न निर्माण करुन लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न सध्या देशात सुरु आहे, अशी टीका पवार यांनी केली. देशात सध्या मंदिर आणि मस्जिद यावरुन सुरु असलेल्या वादावर पवार यांनी शुक्रवार आपले मत व्यक्त केले. ब्राम्हण समाजाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

न्यायालयाने नवाब मलिक यांच्याविषयी केलेल्या टिपणीबाबत पवार म्हणाले, नवाव मलिक यांना मी गेल्या अनेक वर्षापासून ओळखतो, ते चुकीच्या लोकांबरोबर सबंध ठेवूच शकत नाहीत. माझ्यावरही अशा प्रकारचे आरोप करण्यात आले होते, ज्यांनी आरोप केले त्यांनीच विधीमंडळात भाषण करुन याबाबत स्पष्टीकरण दिले होते. विरोधासाठी कोणी विरोध करु नये. नवाब मलिक यांच्याबाबत  निरीक्षण नोंदवले आणि अंतिम निकाल नाही असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.