Development of Chakan: लोकप्रतिनिधी बदलले मात्र चाकणचा विकास कागदावरच!

एमपीसी न्यूज –  मागील अनेक वर्षात चाकणचे (Development of Chakan) शासन बदलले, शासनकर्ते बदलले. अनेकांनी चाकणचा कायापालट करण्याच्या वल्गना केल्या. अनेक आश्वासने देऊन मतांची जुळवणी केली. मात्र, ही आश्वासने, विकास केवळ कागदावरच राहिला आहे. चाकणचा विकासरथ राजकीय इच्छाशक्तीच्या चिखलात रुतला आहे. याबाबत परिसरातील नागरिक खंत व्यक्त करीत आहेत.  

चाकण चौक व अंबेठाण चौक ओलांडण्यासाठी पूर्वी वीस मिनिटे लागत असत. आता चाळीस मिनिटे लागतात. नाशिक फाटा ते राजगुरुनगर रस्ता रुंदीकरण मागच्या पंधरा वर्षांत कागदावरच आहे. तळेगाव – चाकण – शिक्रापूर रस्ता रुंदीकरण कधी होणार? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

Pune People’s Bank : पुणे पीपल्स बँकेच्या यशस्वितेत बबनराव भेगडे यांचा सिंहाचा वाटा – माजी आमदार बाळा भेगडे

चाकणमध्ये महानगरपालिका गरजेची.. 

पिंपरी- चिंचवडच्या धर्तीवर चाकणमध्ये महानगरपालिका (Development of Chakan) होणे, ही काळाची गरज आहे. मात्र, राजकीय उदासीनतेमुळे ते अद्याप होऊ शकलेले नाही. खेडमधून भामा आसखेड धरणाचे पाणी पुणे महानगरपालिकेला जाते पण, चाकणमध्ये पाणी योजना अजून नाही. दरवर्षी पीएमआरडीए चाकणमधील बांधकाम व्यावसायिकांकडून करोडो रुपये विकास निधीच्या नावाखाली गोळा करते. पण, एक रुपयासुद्धा चाकण विभागात खर्च होत नाही.

Maval NCP : मावळ तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदी समीर कदम

चाकणमधील (Development of Chakan) अंतर्गत रस्ते अजूनही विकसित होण्याची वाट पाहत आहेत. डीपी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत आहेत. त्यामुळे भविष्यात हे डीपी रस्ते कधीच तयार होऊ शकणार नाहीत. त्याकडे प्रशासन कानाडोळा करत आहे. दहा वर्षात एमआयडीसी टप्पा क्रमांक पाचचा विकास झालेला नाही. चाकणचे बकालीकरण होत असून ते कधी थांबणार? तसेच, खेड तालुक्यात विमानतळ परत आणण्यासाठी काय प्रयत्न होत आहेत? अशीही नागरिकांकडून विचारणा होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.