Pune News : पुणे मेट्रोचे पहिले तिकीट पंतप्रधान मोदींनी काढले – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज : पुण्याची स्वतःची मेट्रो आज अखेर धावली आहे. पंतप्रधानांनी पहिले तिकीट काढून मेट्रोने प्रवास केला. आम्ही विदाऊट तिकीट प्रवास केला. पण मेट्रोने आमच्याकडून तिकिटाचे पैसे घ्यावे असे मेट्रोला सांगणार आहे, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 6) भरगच्च कार्यक्रम झाले. एमआयटी कॉलेजच्या प्रांगणात झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, प्रवीण दरेकर, प्रकाश जावडेकर, गिरीश बापट, चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, महापौर, महापौर माई ढोरे, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, जपान, फ्रांस देशाचे राजदूत आदी यावेळी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पुण्याच्या गंगेला स्वच्छ करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी लक्ष दिले. यातून स्वच्छ नदी पुण्यात वाहणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्यावर भर दिला जाणार आहे. शहराच्या विकासासाठी केंद्र सरकार ताकदीने उभे राहिले. पुण्यावर आपले खूप प्रेम आहे. पुण्याला, महाराष्ट्राला खूप दिले असल्याचेही फडणवीस म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.