Pune Corona News :- बापरे ! शहरात आज कोरोनाचे 1805 रुग्ण

एमपीसी न्यूज: मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. एकट्या पुणे शहरात आज दिवसभरात तब्बल 1805 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता शहरातील कोरोना बधितांची टक्केवारी थेट 18 टक्क्याच्या वर गेली आहे. शहरात सातत्याने वाढणारा कोरोनाचा आलेखदिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. आज दिवसभरात 131 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे महानगरपालिकेने आज दिवसभरात 13 हजार 443 कोरोना चाचण्या केल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून होणाऱ्या दररोजच्या मोठया रुग्ण वाढीमुळे बुधवारी शहरातील सक्रिय रुग्ण संख्या 5 हजार 464 इतकी झाली आहे. यातील 73  रुग्णाची प्रकृती गंभीर असून शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आज पुण्यात एकाही मृत्यूची नोंद नाही.

दरम्यान महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मागील दोन दिवसात कोरोना चाचण्या वाढवल्या आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांमध्येही वाढ होताना दिसून आहे. आतापर्यंत 5 लाख 14 हजार 494 जण बाधित आढळून आले आहेत. यातील 4 लाख 99 हजार 199 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 9 हजार 119 जण दगावले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.