Wakad News : लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेवर बलात्कार

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून एका व्यक्तीने विवाहित महिलेवर बलात्कार केला. तसेच विवाहितेच्या घरातील संसारोपयोगी साहित्य घेऊन गेला. महिलेच्या नावावर 25 हजारांचे कर्ज देखील काढले. हा प्रकार 26 जुलै 2021 ते 13 नोव्हेंबर 2021 या कालावधीत थेरगाव आणि नेरे दत्तवाडी येथे घडला.

शाहरुख निजामुद्दीन शेख (वय 30, रा. थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित विवाहित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेख याने फिर्यादी यांना ‘तुझा संसार मोडतो’ अशी धमकी दिली. तसेच फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून फिर्यादीची इच्छा नसताना जबरदस्तीने त्यांच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. फिर्यादी यांच्या घरातील सर्व साहित्य, फ्रीज, कपाट, बेड, घर उपयोगी भांडी आरोपी घेऊन गेला.

फिर्यादीच्या गळ्यातील अर्धा तोळ्याचे सोन्याचे डोरले, दीड ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आरोपीने मोडली. तसेच दोन ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील फुले गहाण ठेवली. फिर्यादी यांच्या नकळत त्यांच्या नावावर 25 हजार रुपयांचे कर्ज देखील आरोपीने घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.