Chinchwad News : वृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 13) रात्री आठ वाजता चिंचवडगावात घडली.

तिजा पुष्पराज चौधरी (वय 60, रा. तानाजीनगर, चिंचवड) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास तानाजीनगर, चिंचवडगावातून पायी चालत जात होत्या. शिवाजी उदय मंडळ समोरील रस्त्याने जात असताना त्यांच्या पाठीमागून एका दुचाकीवरून चोरटा आला. त्याने चौधरी यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाची 50 हजारांची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून नेली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.