Pune News : कबूतर चोरीला विरोध केल्याने धारदार शस्त्राने वार

एमपीसी न्यूज : मध्यरात्रीच्या सुमारास कबुतर चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांना विरोध केल्याने त्यांनी दोघांवर धारदार शस्त्राने वार केले. वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सय्यद नगर परिसरात हा प्रकार घडला. वानवडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

रामपाल, साजिद नदाफ आणि एका अनोळखी व्यक्तीवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोहम्मद सोयब कत्तू (वय 44) यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांनी कबुतरे पाळली आहे. कबूतर सोडण्यासाठी 11 जून च्या मध्यरात्री आरोपी आले होते. त्यांनी धारदार शस्त्राचा वार दाखवून कबूतरे करण्याचा प्रयत्न केला परंतु फिर्यादीने त्यांना विरोध केला असता आरोपीने फिर्यादीच्या मुलाला कट्टर फेकून मारला. व फिर्यादीवरून धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये त्यांच्या डाव्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आहे.

त्यानंतर आरोपींनी परिसरात आरडाओरडा करून घातक हत्यारे नाचणीत दहशत माजवत लोकांना भीती घालून निघून गेले आहे. वानवडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.