Gahunje News : विराट कोहली, रोहीत शर्माला भेटण्याचा मोह, अतिउत्साही चाहता पोलिसांच्या ताब्यात 

एमपीसी न्यूज – सध्या सुरु असलेल्या आयपीएलचे सामने गहुंजे स्टेडियमवर खेळवले जात आहेत. शनिवारी (दि.09) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मुंबई इंडियन्स या संघात सामना होता. या सामन्याच्या वेळी एका चाहत्याला अतिउत्साह भोवला असून त्याला तळेगाव दाभाडे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा चाहता विराट कोहलीला हस्तांदोलन करून रोहीत शर्माला भेटण्यासाठी दार ओलांडून मैदानात उतरला. 

दशरथ राजेंद्र जाधव (वय 26, केसुर्डी, खंडाळा, सातारा) असे अटक केलेल्या चाहत्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गहुंजे स्टेडियमवर शनिवारी आयपीएल साखळी सामन्यातील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मुंबई इंडियन्स संघातील सामना होता. या सामन्यावेळी दशरथ सुरक्षा तारा ओलांडून मैदानावर असलेल्या विराट कोहली व रोहीत शर्माला भेटण्यासाठी धावत गेला. कोहलीला हस्तांदोलन करून तो रोहित शर्माकडे जात असताना त्याला पोलिसांनी अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.