Pune News : पुण्याची तरुणी, तरुण मध्यप्रदेशचा; इंस्टाग्रामवर ओळख अन् बलात्काराचा गुन्हा

एमपीसी न्यूज : आधीच लग्न झालेल्या एका तरुणासोबत पुण्यातील तरुणीची इंस्टाग्रामवर ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झालं. त्यानेही आपलं लग्न झाल्याचे लपवून ठेवत प्रेमाचे नाटक केले. लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले. आणि लग्न न करता या तरुणीची फसवणूक केली. अखेर या तरुणीने बलात्कार झाल्याची तक्रार दिली. 

सौरभ सिंग भदोरीया (वय 23, रा. मध्य प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पुण्यातच राहणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. संस्कार भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी तरुणीही पुण्याची आहे तर आरोपी हा मध्य प्रदेशातील आहे. आरोपीने स्वतःच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर खोटी माहिती टाकून फिर्यादी तरुणीसोबत ओळख निर्माण केली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर आपलं पहिलं लग्न झालं असलाचं लपवून त्याने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवलं.

हे आमिष दाखवून त्याने तिच्या राहत्या घरी, कधी गोवा तर कधी मुंबई या ठिकाणी नेऊन तिच्या सोबत शरीर संबंध ठेवले. त्यानंतर 18 मार्च रोजी देखील फिर्यादीच्या राहत्या घरी येऊन फिर्यादी विरोध करीत असताना तिच्या सोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. त्यानंतर लग्न करता फिर्यादीची फसवणूक केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.