Pune News : पुण्याच्या नवी पेठेत अभ्यासिकेत निघालेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग, आरोपीचे अश्लील चाळे

एमपीसी न्यूज : स्पर्धापरीक्षेची तयारी करणारी तरुणी अभ्यासिकेत जात असताना एका अज्ञात व्यक्तीने तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने पॅंटची चेन उघडुन तरुणी समोर अश्लील चाळे केले. 10 जानेवारी रोजी हा प्रकार घडला. 25 वर्षीय तरुणीने या प्रकरणी उशिरा तक्रार दिली. त्यानुसार विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असून 10 जानेवारी रोजी सकाळी ती अभ्यासिकेत जाण्यासाठी निघाली होती. शास्त्री रस्त्यावरील सॅफ्रॉन हॉटेल समोरून जात असताना एका अनोळखी तरूणाने फिर्यादीचे लक्ष वेधून घेत पॅंटची चेन उघडली आणि अश्लील चाळे केले. मला सेक्स करायचा आहे अशा अश्लील भाषेत बोलून फिर्यादीच्या मनाला लज्जा वाटेल असे वर्तन केले. आणि काही अंतर फिर्यादी चा पाठलाग देखील केला.

दरम्यान या सर्व प्रकारानंतर घाबरून गेलेली पीडित तरुणी इतके दिवस गप्प होती. परंतु तिने अखेर विश्रामबाग पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.