Dehugaon : देहूगावात ज्वेलर्ससह चार दुकानांचे चोरट्यांनी उघडले शटर; एका दुकानात चोरी

एमपीसी न्यूज – देहूगावातील परंडवाल चौकात अज्ञात चोरट्यांनी चार दुकानांचे शटर उघडले आणि एका दुकानातून 4700 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 15) पहाटे सव्वाचार वाजता घडला.

किरण नवनाथ काळंगे (वय 40, रा. परंडवाल चौक, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे परंडवाल चौक, देहूगाव येथे ओम क्रिएशन नावाचे कपड्याचे दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी बुधवारी पहाटे त्यांच्या दुकानाचे शटर उघडले आणि दुकानात प्रवेश केला. दुकानातून 4700 रुपये रोख रक्कम चोरटयांनी चोरून नेली.

त्यानंतर चोरट्यांनी फिर्यादी यांच्या दुकानाच्या शेजारी असलेले देवा इलेक्ट्रिकल, संतकृपा मेडिकल आणि शुभम ज्वेलर्स या तीन दुकानांचे शटर उचकटून त्यात चोरी करण्याचा प्रयत्न केला. देहूरोड पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.