Pune News : बायको नांदायला येत नसल्यामुळे जावयाचा सासरवाडीत राडा

सासू-सासर्‍यांना जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज : बायको नांदायला येत नसल्याच्या कारणावरून एका तरुणाने सासरवाडीतच धिंगाणा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास पुरंदर तालुक्यातील भोसलेवाडी गावात हा प्रकार घडलाय. त्यानंतर बायकोने दिलेल्या तक्रारीवरून धिंगाणा घालणाऱ्या नवऱ्याविरोधात जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

संदीप पांडुरंग मेमाने असे धिंगाणा घालणाऱ्या जावयाचे नाव आहे. याप्रकरणी ऐश्वर्या संदीप मेमाने यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी हे नात्याने पती-पत्नी आहेत. फिर्यादी या पतीकडे न राहता वडिलांच्या घरी भोसलेवाडी या ठिकाणी राहतात. दरम्यान पत्नी नांदायला येत नसल्यामुळे आरोपी संदीप माने याने सासऱ्याच्या घरासमोर धिंगाणा घातला. तसेच पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण केली.

आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने हातात कोणता घेऊन सासर्‍याला उद्देशून तुम्हाला कापून टाकतो आणि तुमची पोरगी घेऊन जातो, बायकोला उद्देशून तुला तुझ्या भावाला आणि तुझ्या घरच्यांना संपवतो असे म्हणून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

जेजुरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक महाडिक करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.