Dehuroad News : देहूरोड, वाकड, दिघी पोलीस ठाण्यात स्त्री अत्याचाराचे तीन गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – देहूरोड, वाकड आणि दिघी पोलीस ठाण्यात विवाहितांच्या छळ प्रकरणी स्त्री अत्याचाराचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

देहूरोड पोलीस ठाण्यात 35 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासू, जाऊ, दीर आणि सास-याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी वारंवार हुंड्याची मागणी करून दिराने विवाहितेचे फोटो काढून अश्लील व्हिडीओ दाखवण्याचा व लगट करण्याचा प्रयत्न केला. विवाहितेने माहेरहून पाच लाख रुपये आणले नाहीत म्हणून तिला उपाशी पोटी बंद खोलीत डांबून ठेवले. विवाहितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तिचे स्त्रीधन काढून घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

वाकड पोलीस ठाण्यात 36 वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती ऑगस्टीन अल्बर्ट फर्नांडिस (रा. विश्रांतवाडी, पुणे) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने वारंवार दारू पिऊन घरगुती कारणावरून तसेच विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ केला. डिसेंबर 2013 मध्ये विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ करत तिचे डोके जोरात भिंतीवर आपटून नाकाचे हाड फ्रॅक्चर केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

दिघी पोलीस ठाण्यात 30 वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सासरच्या सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेच्या कमरेजवळ आलेल्या पांढ-या डागांच्या कारणावरून तसेच पतीला दुसरे लग्न करण्यासाठी फिर्यादी संमती देत नसल्याच्या कारणावरून तिला हीं दर्जाची वागणूक देऊन मारहाण करत छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.