Chikhali Crime News : टँकरखाली सापडून तीन वर्षीय मुलाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – टँकरखाली सापडून तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. हा अपघात दुपारी बारा वाजताच्या सुमारास चिखली येथे घडला.

अदनान शमशुद्दीन मणिहार (वय 3, रा. ऐश्वर्यम हमारा सोसायटी, चिखली) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

ऐश्वर्यम हमारा सोसायटीमध्ये टँकरने पाणी पुरविण्याचे काम सुरु होते. दुपारी बारा वाजताच्या सुमारास अदनान टँकरखाली सापडला . गंभीर जखमी झालेल्या अदनान याचा जागीच मृत्यू झाला.

त्याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.