Today’s Horoscope 26 October 2022 : आजचे राशीभविष्य 26 ऑक्टोबर 2022

एमपीसी न्यूज – आजचे पंचांग. 26 ऑक्टोबर 2022.
Today’s Horoscope 26 October 2022
  • शुभाशुभ विचार- आनंदी दिवस.
  • आज विशेष – दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा, अभ्यंग स्नान, वही पूजन. 
  • राहू काळ – दुपारी १२.०० ते १.३०.
  • दिशा शूल- उत्तरेस
  •  असेल.
  • आजचे नक्षत्र- स्वाती १३.२४ पर्यंत नंतर विशाखा
  • ————————————-

 मेष – शुभ रंग- क्रीम

धंद्यातील येणी वसूल होतील. गोड बोलून आज तुम्ही आपल्या विरोधकांनाही आपलेसे कराल. जुनी दुखणी अंगावर न काढता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज तुम्हाला विश्रांतीही आवश्यक आहे.

वृषभ- शुभ रंग- गुलाबी

कलेच्या क्षेत्रातील मंडळींना वाढत्या स्पर्धेचा सामना करावा लागेल. आज तुम्हाला आरोग्याच्या काही तक्रारी त्रस्त करतील. संध्याकाळी डॉक्टरांच्या भेटीचा योग दिसतो.

मिथुन- शुभ रंग- पांढरा

कुटुंबियांच्या वाढत्या मागण्या पुरवताना नाकी नऊ येतील. मुले आज अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करतील. गृहिणी आज पाहुण्यांची उठवस आनंदाने करतील.

कर्क- शुभ रंग- निळा

आज तुम्ही गरजूंना मदत करण्यासाठी सक्षम असाल. इतरांची मने सांभाळाल. सामाजिक कार्यकर्ते आज लोकांच्या आदरास पात्र होतील. आज काही शुभ समाचार येणार आहेत.

सिंह – शुभ रंग- स्ट्रॉबेरी

आवक पुरेशी असल्याने मनासारखा खर्च करू शकाल. क्षुल्लक कारणावरून शेजारी आज रुसून बसतील. आज जरा स्पष्टवक्तेपणास आवर घाला नाहीतर नाती दुरावतील.

कन्या- शुभ रंग- आकाशी

आज तुम्ही काहीसे हट्टी पणाने वागाल. कोणाचेही ऐकून घ्यायची तुमची तयारी नसेल. घाईगर्दीत घेतलेले काही निर्णय चुकतील. हातचे सोडून पळत्या मागे धावायचा होईल, पण तसे करू नका.

तूळ- शुभरंग- पिस्ता

एखादी हरवलेली वस्तू पुन्हा शोधली तर सापडेल. आज तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. नवी वस्त्र खरेदी होईल. घरात मोठ्यांच्या होला हो करा पण वाद वाढवू नका.

 वृश्चिक- शुभ रंग- केशरी

महत्त्वाच्या कामासाठी आज भटकंती होईल. अनावश्यक खर्चाचे प्रमाणही वाढणार आहे. अधिकारी वर्गास विदेश दौरे घडतील. हातचे सोडून मृगजळा मागे धावाल.

 धनु- शुभ रंग- चंदेरी

नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. नव्या व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. कामाच्या व्यापात घरगुती समस्या मात्र दुर्लक्षित होतील.

 मकर- शुभरंग- मोतिया

काही मनाविरुद्ध घटनांनी आज तुम्हाला नैराश येईल. कार्यक्षेत्रात नवे उपक्रम सुरू करण्यासाठी आज दिवस योग्य नाही. वैवाहिक जीवनात आज काही सौम्य मतभेद संभवतात.

 कुंभ- शुभरंग- जांभळा

 आज तुमचा आध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. नास्तिक ही आज देवाला एखादा नवस करून बघतील. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. दैवाची साथ राहील.

 मीन- शुभरंग-भगवा

 नवे व्यावसायिक वाढत्या स्पर्धेने त्रस्त असतील. अडचणीच्या प्रसंगी पत्नीची खंबीर साथ राहील. कुटुंबियांस आज वेळ देणे अवघड होईल. सत्संगाने आत्मिक बळ वाढेल.

Aries – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – मेष : करिअर व आर्थिक स्थिती सुधारणा

Taurus: Annual Horoscope 2022-23- वार्षिक राशी भविष्य – वृषभ : परदेशगमन व प्रवासाचा योग

Gemini – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – मिथुन : अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल

Cancer- Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – कर्क – संघर्षातून यशप्राप्ती

Leo- Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य : सिंह – हळूहळू पण नक्कीच यशप्राप्ती

Virgo – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – कन्या: जीवनात चढ-उतार

Libra – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य : तूळ – कायदेशीर कामात यशदायक कालखंड

Scorpio : Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – वृश्चिक: अविस्मरणीय वर्ष

Sagittarius – Annual Horoscope 2022-2023 : वार्षिक राशी भविष्य – धनु : पदवी व पुरस्कार प्राप्तीचे योग

शुभम भवतु
जयंत बाळकृष्ण कुलकर्णी
( ज्योतिष व वास्तु सल्लागार)
फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.