India Corona Update : पॉझिटिव्हीटी रेट 6.63 टक्क्यांवर, 24 तासांत 1.27 लाख नवे रुग्ण
एमपीसी न्यूज – देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावत असून, दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 6.63 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. गेल्या चोवीस तासांत देशभरात 1 लाख 27 हजार 510 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मागील 54 दिवसांतील ही निच्चांकी रुग्णवाढ आहे.
देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 81 लाख 75 हजार 044 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 कोटी 59 लाख 47 हजार 629 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात गेल्या 24 तासांत 2 लाख 55 हजार 287 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
India reports 1,27,510 new #COVID19 cases, 2,55,287 discharges & 2,795 deaths in last 24 hrs, as per Health Ministry
Total cases: 2,81,75,044
Total discharges: 2,59,47,629
Death toll: 3,31,895
Active cases: 18,95,520Total vaccination: 21,60,46,638 pic.twitter.com/AgS0JDgEGH
— ANI (@ANI) June 1, 2021
देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येत निरंतर घट होत असून, देशात सध्याच्या घडीला 18 लाख 95 हजार 520 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 92.09 टक्के एवढा झाला आहे.
देशातील कोरोना मृतांची संख्या 3 लाख 31 हजार 895 वर पोहोचली आहे. मागील 24 तासांत देशभरात 2 हजार 795 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. देशाचा मृत्यूदर 1.17 टक्के एवढा झाला आहे.
देशात आजवर 34 कोटी 67 लाख 92 हजार 374 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 19 लाख 25 हजार 374 चाचण्या सोमवारी (दि.31) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
#COVID19 | A total of 34,67,92,257 samples tested up to May 31. Of which 19,25,374 samples were tested yesterday: Indian Council of Medical Research (ICMR) pic.twitter.com/IFJLBFB65l
— ANI (@ANI) June 1, 2021
देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 21 कोटी 60 लाख 46 हजार 638 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.