Sangvi Crime News : चार वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य; 12 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – चार वर्षीय चिमुरड्या मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपळे गुरव येथे रविवारी (दि. 12) दुपारी दीड ते तीनच्या सुमारास घडला. या प्रकरणी १२ वर्षीय मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित चार वर्षीय मुलाच्या वडिलांनी सांगवी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. 15) फिर्याद दिली असून, याप्रकरणी 12 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी फिर्यादीचा पीडित मुलगा सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळण्यासाठी गेला होता. त्यावेळी 12 वर्षीय बालकाने पीडित मुलाला सोसायटीच्या पार्किंगमध्ये नेले आणि अनैसर्गिक कृत्य केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस आणखी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.