Talegaon News : पवना सहकारी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न
एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील इंदोरी येथे पवना सहकारी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. हा प्रकार 29 ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता घडला. याबाबत 10 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी एका महिलेने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील इंदोरी येथे पवना सहकारी बँकेचे एटीएम आहे. 29 ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास एका अज्ञात चोरट्याने त्याच्या हातातील स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने एटीएमची कॅश भरण्याचा फ्रंट डोअर उचकटला. तसेच एटीएम मधून पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केला. याबाबत तब्बल बारा दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.