Pimpri Crime News : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या इसमाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू 

एमपीसी न्यूज – मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 57 वर्षीय इसमाचा अज्ञात दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला आहे. पिंपरीतील रिव्हर रोडवर सोमवारी (दि.14) सकाळी सव्वा सहा ते आठच्या दरम्यान हि घटना घडली. 

राजू सुगनोमल वाधवा (वय 57) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी  मयत राजू वाधवा यांचा मुलगा दिपक राजू वाधवा ( वय 32, रा. लक्ष्मी धर्मशाळेच्या शेजारी, पिेपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात दुचाकी चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत राजू वाधवा सोमवारी (दि.14) सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर गेले होते. त्यावेळी पिंपरीतील रिव्हर रोड येथे त्यांना दुचाकीने पाठीमागुन जोरात धडक दिली. वाधवा डांबरी रस्त्यावर पडल्याने त्यांच्या तोंडाला जखम झाली. उपचारासाठी त्यांना वायसीएम रूग्णालयात दाखल केले पण, तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.