Talegaon Dabhade News : मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ग्रामीण ब्लॉक अध्यक्षपदी आशिष ढोरे यांची निवड

एमपीसी न्यूज – इंदोरी येथील युवा कार्यकर्ते व माजी उपसरपंच आशिष ढोरे यांची मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या ग्रामीण ब्लॉक अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पक्षाशी असलेली बांधिलकी आणि सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.

निवडीचे पत्र तालुका युवक अध्यक्ष किशोर सातकर व आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे हस्ते ढोरे यांना सुपूर्त करण्यात आले.

 याप्रसंगी बबनराव भेगडे, विठ्ठल शिंदे, साहेबराव कारके उपस्थित होते. ग्रामीण भागात पक्षाची ध्येयधोरणे घराघरात पोचवून युवक संघटन वाढवून व मजबूत करण्याचा प्रयत्न करीन, असे ढोरे यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

<