Chinchwad : रावेत येथे कारला आग

एमपीसी न्यूज – रावेत येथे कारला आग लागली. आगीमध्ये कारचा पुढील भाग जळून खाक झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. 30) रात्री घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी रोडवर बालाजी हॉटेल जवळ रावेत येथे पार्क केलेल्या कारला (एमएच 12 / एल डी 3222) सोमवारी रात्री उशिरा अचानक आग लागली. आगीमध्ये कारचा पुढील इंजिनचा भाग जळून खाक झाला आहे.

अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच प्राधिकरण उपविभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. वाहन चालक नितीन कोकरे, सिनियर फायरमन संतोष सारोटे, फायरमन अनिल माने, भूषण येवले, ट्रेनी सबऑफिसर शुभम सावंत यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

पेटलेल्या कारच्या बाजूला आणखी तीन कार पार्क केल्या होत्या. तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा धोका टळला आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.