Chinchwad News : गुटखा विक्री प्रकरणी तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज्- बेकायदेशीरपणे गुटखा विक्री केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 29) दुपारी महावीर चौक, चिंचवड येथे करण्यात आली.

पंकज विश्वमित्र सिंग (वय 19, रा. तापकीर नगर, काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत शहाजी वसंत धायगुडे (वय 40, रा. तापकीर नगर, काळेवाडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात गुटखा विक्री आणि बाळगण्यास बंदी आहे. असे असताना आरोपी पंकज सिंग याने बेकायदेशीरपणे गुटखा विक्रीसाठी बाळगला. पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करून चार हजार तीनशे पन्नास रुपयांचा गुटखा आणि एक दुचाकी असा एकूण 29 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस कारवाई करण्यासाठी आल्याचे पाहून आरोपी पंकज हा पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.