Pune News : फरार सागर सूर्यवंशी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज : वेगवेगळ्या गंभीर 11 गुन्ह्यात मागील अनेक दिवसांपासून फरार असलेल्या ऍड सागर सुर्यवंशीला शुक्रवार पेठेतून सीआयडीने (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग) अटक केली. पुण्यातील शिवाजीनगर तसेच पिंपरी, भोसरी एमआयडीसी आणि नवघर यासह विविध पोलिस ठाण्यात फसवणूकीचे ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

शिवाजीनगर न्यायालयाकडून त्याला फरारी घोषित केले होते. तसेच, उच्च न्यायालयाने गेल्या तीन वर्षापासून फरार असलेला अ‍ॅड. सुर्यवंशीला का अटक होत नाही, अशी विचारणा देखील सीआयडीकडे केली होती.

त्यानुसार सीआयडीचे प्रमुख रितेश कुमार यांनी आरोपीला अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सीआयडीचे पथक गेल्या काही दिवसांपासुन अ‍ॅड. सुर्यवंशीच्या मागावर होते. त्यादरम्यान, तो शुक्रवार पेठेतील रेणुका माता मंदिर येथे दर्शनासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला साध्या वेशात सापळा रचून मंदिराजवळ पकडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.