Pune News : नियत्रंण कक्षाला फोन करून पत्नीचा खून झाल्याचे सांगितले, पोलीस दाखल होताच…

एमपीसी न्यूज : लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून पत्नीचा खून झाल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्याने स्वतः खून केल्याची कबुली दिली. चारित्र्याच्या संशयावरून गळा दाबून त्याने पत्नीचा खून केला आणि मृतदेह रस्त्याच्या कडेला नेऊन टाकला होता. 

विद्या राहुल फडतरे (वय २६) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात राहुल ज्ञानोबा फडतरे (वय ३२) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. राहुल हा टेम्पो चालक आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे पती पत्नी मंतरवाडी परिसरात भाड्याचे घरात राहत होते. आरोपी हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असत. त्यातून त्यांच्यात सतत वाद होत असत. तो पत्नीला मारहाण देखील करत असत. दरम्यान, सोमवारी दुपारी देखील त्यांच्यात वाद झाला. या वादात त्याने पत्नीला मारहाण केली व गळा दाबला. परंतु, पत्नी निपचित पडल्यानंतर त्याला पत्नीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने मृतदेह घराजवळ नेहून रस्त्याच्या कडेला काही अंतर आतमध्ये नेहून टाकला.

तसेच, पोलीस नियत्रंण कक्षाला (102) पत्नीचा कोणी तरी खून केला असल्याची माहिती दिली. ही माहिती लोणी काळभोर पोलीसांना देण्यात आली. तत्काळ वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी व पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे व मार्शलने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी माहिती घेत चौकशी केल्यानंतर आरोपीने खून केल्याची कबूली दिली. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.