Sinhagad Express : सिंहगड एक्सप्रेसमध्ये प्रवाशांमध्ये जागेच्या वादावरून तुंबळ हाणामारी

एमपीसी न्यूज : सिंहगड एक्सप्रेसमध्ये (Sinhagad Express) प्रवाशांच्या दोन गटात जागेवरून वाद झाल्यानंतर तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणारी सिंहगड एक्सप्रेस बुधवारी सकाळी चिंचवड स्टेशनवर आल्यानंतर हा सर्व प्रकार घडल्याची माहिती मिळाली. काही प्रवाशांमध्ये सुरुवातीला जागेवरून शाब्दिक चकमक सुरू झाली. त्यानंतर पाहता पाहता हा वाद इतका टोकाला गेला की यावेळी प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली. काही प्रवासी या मारहाणीत खाली पडले. तरीसुद्धा हाणामारी करणारे काही थांबण्याचे नाव घेत नव्हते. अखेरीस डब्यातील इतर प्रवाशांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद थांबला. 
दरम्यान, या सर्व प्रकाराचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. हा सर्व प्रकार सुरू असताना डब्यातीलच काही प्रवाशांनी हा सर्व प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. आणि हा सर्व प्रकारचा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सिंहगड एक्सप्रेस ही पुण्याहून मुंबईला जात असते. जागेच्या (Sinhagad Express) अभावी या रेल्वेत वादाचे प्रसंग नेहमीच घडत असतात. पुणे रेल्वे स्थानकावरून सुटणारी ही गाडी शिवाजीनगरला जाईपर्यंत भरून जाते. त्यानंतर पिंपरी आणि चिंचवडच्या प्रवाशांसाठी या रेल्वेत जागाच नसते. त्यामुळे अशा प्रकारचे वादाचे प्रसंग नेहमीच घडत असतात. या घटनेनंतर पिंपरी आणि चिंचवड साठी वेगळ्या भोगीची मागणी पुन्हा एकदा होताना दिसत आहे. या मागणीला रेल्वे कडून काय प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.