IPL 2022 News : चेन्नईने केली दिल्ली कॅपिटल्सवर ९१ धावांनी मात

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी)सततच्या पराभवाने डिवचल्या गेलेल्या चेन्नई सुपर किंग्जने काल जबरदस्त खेळ करत दिल्ली कॅपिटल्सला तब्बल 91 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत करत आपला तिसरा विजय नोंदवला आहे.

काल ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण तो निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवत चेन्नई सुपर किंग्जने आपल्या 20 षटकात 208 धावांचा डोंगर रचला.ऋतुराज गायकवाड आणि कॉन्व्हे यांनी 11 षटकात 110 धावांची जबरदस्त सलामी दिली.ऋतूराज चांगले खेळत असतानाच 41 धावा करून नोर्जेच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

त्यानंतर आलेल्या शिवम दुबेनही आक्रमक अंदाजात खेळत कॉन्व्हेला चांगली साथ देत 59 धावांची बहुमूल्य भागीदारी करुन धावांचा ओघ चालूच ठेवला.कॉन्व्हेने आणखी एक जबरदस्त खेळी करत केवळ 49 चेंडूत 7 चौकार आणि 5 उत्तुंग षटकात मारत 87 धावा केल्या, तो शतकी मजल सहज गाठेल असे वाटत असतानाच तो खलील अहमदच्या गोलंदाजीवर पंतच्या हाती झेल देवून तंबूत परतला.

त्याचे शतक हुकले असले तरी त्याने संघाला एक मजबूत सुरुवात करुन दिली होती.तो बाद झाला आणि पुढच्याच षटकात शिवम दुबेही मिशेल मार्शच्या गोलंदाजीवर 32 धावा करून बाद झाला,यावेळी चेन्नईची धावसंख्या अठराव्या षटकात 3 बाद 170 अशी होती, यानंतर रायडू,उथप्पा आणि मोईन अली स्वस्तात बाद झाले असले तरी कर्णधार माहीने आक्रमक अंदाजात खेळत तळाच्या फलंदाजांच्या साथीने उरलेल्या 17  चेंडूत 38 धावा जमवून संघाला 208 धावांची मोठी मजल मारून दिली.

यात माहीचा वाटा होता,8 चेंडुत काढलेल्या 21 आक्रमक धावांचा,ज्यात होते उत्तुंग 2 षटकारदिल्ली साठी नोर्जेने 3 तर खलील अहमदने दोन बळी मिळवले मात्र त्यांना दुसऱ्या बाजूने फारशी साथ न मिळाल्याने दिल्ली कॅपिटल्सला चेन्नईवर जराही वर्चस्व गाजवता आले नाही,त्याचाच फायदा घेत चेन्नईने 208 धावांची विशाल धावसंख्या रचली.

या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली संघाची चांगलीच दमछाक झाली,श्रीकर भरत डावाच्या दुसऱ्याच षटकात 8 धावा काढून सिमरनजीत सिंगच्या गोलंदाजीवर बाद झाला,यावेळी दिल्लीच्या नावावर फक्त 16 धावा होत्या, यात फक्त 20 धावांची भर पडलेली असतानाच भरोशाचा डेविड वॉर्नरही फक्त 19 धावा करून तीक्ष्णाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला आणि दिल्ली संघाला दुसरा मोठा धक्का बसला.यानंतर मिशेल मार्श आणि पंत या जोडीने थोडाफार प्रतिकार करत डाव पुढे चालू ठेवला पण तो प्रतिकारही तोकडाच ठरला.

मोईन अलीने आधी मार्शला 25 तर दुसऱ्या षटकात पंतला 21 धावांवर बाद करून दिल्लीच्या डावाला खिंडार पाडले आणि या धक्क्यातून दिल्ली संघ सावरला नाही तो नाहीच.चार बाद 75 वरुन दिल्ली कॅपिटल्सची घसरगुंडी सर्वबाद 117 अशी नाचक्कीजनक उडाली आणि दिल्ली संघाला 91 धावांनी मोठा पराभव स्विकरावा लागला.चेन्नई साठी मोईन अलीने सर्वोत्तम गोलंदाजी करत तीन बळी तर सिमरनजीत सिंग ,द्वेन ब्रावोआणि मुकेश चौधरीनी दोन दोन बळी मिळवले.या विजयाने चेन्नईला बऱ्यापैकी समाधान मिळाले तर दिल्ली साठी हा पराभव मात्र निराशा वाढवणारा ठरला.

पिंपरी(विवेक कुलकर्णी)सततच्या पराभवाने डिवचल्या गेलेल्या चेन्नई सुपर किंग्जने काल जबरदस्त खेळ करत दिल्ली कॅपिटल्सला तब्बल 91 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत करत आपला तिसरा विजय नोंदवला आहे.
काल ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण तो निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवत चेन्नई सुपर किंग्जने आपल्या 20 षटकात 208 धावांचा डोंगर रचला.ऋतुराज गायकवाड आणि कॉन्व्हे यांनी 11 षटकात 110 धावांची जबरदस्त सलामी दिली.

ऋतूराज चांगले खेळत असतानाच 41 धावा करून नोर्जेच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.त्यानंतर आलेल्या शिवम दुबेनही आक्रमक अंदाजात खेळत कॉन्व्हेला चांगली साथ देत 59 धावांची बहुमूल्य भागीदारी करुन धावांचा ओघ चालूच ठेवला.

कॉन्व्हेने आणखी एक जबरदस्त खेळी करत केवळ 49 चेंडूत 7 चौकार आणि 5 उत्तुंग षटकात मारत 87 धावा केल्या, तो शतकी मजल सहज गाठेल असे वाटत असतानाच तो खलील अहमदच्या गोलंदाजीवर पंतच्या हाती झेल देवून तंबूत परतला.त्याचे शतक हुकले असले तरी त्याने संघाला एक मजबूत सुरुवात करुन दिली होती.

तो बाद झाला आणि पुढच्याच षटकात शिवम दुबेही मिशेल मार्शच्या गोलंदाजीवर 32 धावा करून बाद झाला,यावेळी चेन्नईची धावसंख्या अठराव्या षटकात 3 बाद 170 अशी होती, यानंतर रायडू,उथप्पा आणि मोईन अली स्वस्तात बाद झाले असले तरी कर्णधार माहीने आक्रमक अंदाजात खेळत तळाच्या फलंदाजांच्या साथीने उरलेल्या 17 चेंडूत 38 धावा जमवून संघाला 208 धावांची मोठी मजल मारून दिली,यात माहीचा वाटा होता,8 चेंडुत काढलेल्या 21 आक्रमक धावांचा,ज्यात होते उत्तुंग 2 षटकार दिल्ली साठी नोर्जेने 3 तर खलील अहमदने दोन बळी मिळवले मात्र त्यांना दुसऱ्या बाजूने फारशी साथ न मिळाल्याने दिल्ली कॅपिटल्सला चेन्नईवर जराही वर्चस्व गाजवता आले नाही,त्याचाच फायदा घेत चेन्नईने 208 धावांची विशाल धावसंख्या रचली.

या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली संघाची चांगलीच दमछाक झाली,श्रीकर भरत डावाच्या दुसऱ्याच षटकात 8 धावा काढून सिमरनजीत सिंगच्या गोलंदाजीवर बाद झाला,यावेळी दिल्लीच्या नावावर फक्त 16 धावा होत्या, यात फक्त 20 धावांची भर पडलेली असतानाच भरोशाचा डेविड वॉर्नरही फक्त 19 धावा करून तीक्ष्णाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला आणि दिल्ली संघाला दुसरा मोठा धक्का बसला.यानंतर मिशेल मार्श आणि पंत या जोडीने थोडाफार प्रतिकार करत डाव पुढे चालू ठेवला पण तो प्रतिकारही तोकडाच ठरला.मोईन अलीने आधी मार्शला 25 तर दुसऱ्या षटकात पंतला 21 धावांवर बाद करून दिल्लीच्या डावाला खिंडार पाडले आणि या धक्क्यातून दिल्ली संघ सावरला नाही तो नाहीच.

चार बाद 75 वरुन दिल्ली कॅपिटल्सची घसरगुंडी सर्वबाद 117 अशी नाचक्कीजनक उडाली आणि दिल्ली संघाला 91 धावांनी मोठा पराभव स्विकरावा लागला.चेन्नई साठी मोईन अलीने सर्वोत्तम गोलंदाजी करत तीन बळी तर सिमरनजीत सिंग ,द्वेन ब्रावोआणि मुकेश चौधरीनी दोन दोन बळी मिळवले.या विजयाने चेन्नईला बऱ्यापैकी समाधान मिळाले तर दिल्ली साठी हा पराभव मात्र निराशा वाढवणारा ठरला.

संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज
6 बाद 208
कॉन्व्हे 87,ऋतुराज 41,दुबे 32धोनी 21 नाबाद,
खलील 28/2,नोर्जे 42/3
विजयी विरुद्ध
दिल्ली कॅपिटल्स
17.4 षटकात सर्वबाद 117
वॉर्नर 19,मार्श 25,पंत 21,ठाकूर 24
मोईन अली 13/4,ब्रावो 24/2,चौधरी 22/2

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.