Chinchwad News : परिक्षेसाठी गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थीनीचे अपहरण 

एमपीसी न्यूज – परिक्षेसाठी गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थीनीचे अपहरण केल्याची तक्रार चिंचवड पोलीस ठाण्यात दिली आहे. 16 वर्षीय मुलगी फत्तेचंद जैन कॉलेज येथे परिक्षेसाठी गेली असता गुरुवारी (दि.07) सकाळी 9.00 वा ही घटना घडली. 

याबाबत मुलीच्या आईने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात इसमाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 16 वर्षे 10 महिने वयाची मुलगी गुरुवारी फत्तेचंद जैन कॉलेज येथे परिक्षेसाठी गेली होती. दरम्यान, मुलीला कुणीतरी फुस लावून तिचे अपहरण केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.