India Corona Update : देशात दिड लाखांहून कमी सक्रिय रुग्ण, रिकव्हरी रेट 97.19 टक्के 

एमपीसी न्यूज – देशात नव्यानं वाढ होणा-या रुग्णांपेक्षा बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या दिड लाखांहून कमी झाली असून, सध्या 1 लाख 48 हजार 590 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 97.19 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

आरोग्य मंत्रालाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात मागील 24 तासांत 11 हजार 713 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 95 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 08 लाख 14 हजार 304 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 05 लाख 10 हजार 796 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 14 हजार 488 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशात तब्बल वीस कोटी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 20 कोटी 06 लाख 72 हजार 589 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 7 लाख 40 हजार 794 नमून्यांची तपासणी शुक्रवारी (दि.5) करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात 95 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 54 हजार 918 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.43 टक्के एवढा आहे‌. तर, रिकव्हरी रेट 97.17 टक्के एवढा झाला आहे. देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली त्यापासून आतापर्यंत 54 लाख 16 हजार 849 जणांचे लसीकरण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.